Thursday, April 7, 2011

लोकपाल विधेयक --- स्वातंत्र्याची दुसरी लढाई -- अण्णा हजारे !!!

पुढील लेख हा माझा office मधील मित्र सारंग याने लिहिलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया त्याला sarang.bhoirkar@gmail.com यावर कळवा...


"अब तक छप्पन" या सिनेमात नाना पाटेकरचा एक Dialogue आहे...
तो म्हणतो, "साला अपना रंडी जैसा है, एक कस्टमर गया तो दुसरा आने से पहिले पावडर, लाली
लगाके सुक सुक ...सुक सुक ... ऐसा आवाज देते बैठने का " !!!!
मला वाटत आपल्या भारतीय समाजाची अवस्था याहून काही वेगळी नाही...
१९४७ पासून आपण हेच तर करतोय किंवा आपल्याबरोबर केल जातंय..... आणि करणार दुसर-तिसर कुणीही नसून आपल मायबाप "भारत सरकार" आहे.... काही ठराविक वर्षांनी होणार्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हेच तर होत आलय....

इंग्रजीत एक म्हण आहे.... "When you cant resist the rape, enjoy it...."
आणि आपण एन्जॉय करायला शिकलो आहोत....किंवा आपल्यापुढे दुसरा पर्यायच उरला नाहीये.....

परिवर्तन, प्रबोधन, यांसारखे शब्द आता एकतर Dictionary त सापडतात किंवा समाजातल्या उच्चभ्रू  वर्गाने किंवा एखाद्या राजकारण्याने स्वतःचा काळा पैसा tax मधून वाचावा म्हणून उभारलेल्या "सामाजिक संस्थांची" नाव म्हणून दिसतात.

गेल्या काही वर्षात झालेल्या घोटाळ्यांमुळे तर भारताच नवं नामकरण "INDIA.... A Land Of Scams" अस करण्यास काहीच हरकत नसावी...
अरे घोटाळे करता का चेष्टा...??  2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची किंमत तर मला आकड्यांमध्ये लिहिताही येत नाही..... शाळेत गणित शिकविणार्या सरांनी "हि मध्यमवर्गीय पोर फार तर लाख किंवा करोड पर्यंत जाणार (अमेरिकेला वगैरे गेले तर...)" या हिशोबाने गणित शिकवलं.... त्यामुळे
हजार कोटी वगैरेची आकडेमोड आम्हाला जमण म्हणजे पुण्याचे आदर्श खासदार श्री. सुरेश कलमाडी सलग महिनाभर पुण्यात राहण्याइतक दुरापास्त !!!

पण आता वाटायला लागलय कि  घडू शकत काहीतरी...... २ एप्रिलला रात्री जसा अख्खा भारत एक झाला होता तितका नसेल पण थोडफार प्रत्येक जण अण्णांना पाठींबा देतोय आपापल्यापरीने.....facebook, twitter, या माध्यमांतून !!!

गेल्या महिन्यातच अण्णांची चिंचवडच्या डांगे चौकात एक सभा झाली; लोकपाल विधेयकाच्या प्रचारासाठी .... त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे अप्रतिम होते.....
१)  सगळ्यात आधी  त्यांनी याच्या आधीच आंदोलन जे "माहितीचा अधिकार" कायद्यासाठी केल होत त्याची माहिती देताना अस सांगितलं कि  उपोषणाच्या १२ व्या दिवशी मागण्या मंजूर झाल्या...१० वर्षे हा लढा चालू होता...
२) या अधिकारात भ्रष्टाचारी माणसाची माहिती मिळू शकते पण त्याला शिक्षा होण्याची यात तरतूद नाही....
३) म्हणून मग लोकपाल विधेयकाद्वारे या तरतुदी मांडण्यात आल्या ज्याला अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा ठाम विरोध आहे....
४) सरकारने "उपाय" म्हणून स्वतःच एक लोकपाल विधेयक मांडलं जे अतिशय कमकुवत आहे.
५) म्हणून जनतेन तयार केलेल्या लोकपाल विधेयकाची गरज आहे..
६) हल्लीचे राजकारणी एक साखळी तयार करतात... आधी सत्ता, मग त्यातून पैसा मग त्यातून परत    सत्ता.....    हि साखळी तोडायला हवी.....
७) आणि म्हणून अण्णांनी शेवटी या आंदोलनाच वर्णन "स्वातंत्र्याची दुसरी लढाई " अस केल.


सरकारने मांडलेल्या लोकपाल विधेयाकातल्या तरतुदिंकडून भ्रष्ट माणसाला शिक्षा होण्याची अपेक्षा करण म्हणजे नसबंदी केलेल्या पुरुषाकडून प्रजननाची अपेक्षा ठेवण्यासारख आहे....

जगातली  सर्वात मोठी लोकशाही समजल्या जाणार्या भारतीय संसदेत लोकपाल विधेयक तब्बल ४२ वर्षांपूर्वी मांडण्यात आल...
सर्वप्रथम १९६९ मध्ये लोकपाल विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं. तिथे ते मंजूरही झालं मात्र त्याला राज्यसभेत मंजूरी मिळाली नाही.
त्यानंतर १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ साली हे विधेयक मांडण्यात आले. मात्र अजूनही ते मंजूर झालं नाही.
सरकारच्या आणि भ्रष्ट अधिकारी व राजकारणी यांवर अंकुश ठेवू शकणारं विधेयक मंजूर व्हायला इतकी वर्ष लागावीत हि शरमेची नाही तर लांछनास्पद गोष्ट आहे.. आणि ते हि बरोबरच आहे म्हणा...लोकपाल विधेयक संसदेत राजकारण्यांपुढे मंजुरीसाठी ठेवण म्हणजे शिरीष कणेकरांच्या
भाषेत सांगायचं तर "दाउद इब्राहीमला स्मगलिंग विरोधी समितीचा अध्यक्ष हो अस म्हणण्यासारख आहे..."
आपण बलात्कार एन्जॉय करायला शिकलो आहोत अस मी म्हटलं न ते याचमुळे !!!!!

स्वातंत्र्यपूर्व काळात एक म्हातारा असाच वेड्यासारखा उपास वगैरे करून सत्याग्रह, अहिंसा या गोष्टी सांगत बसायचा...त्याने पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिल अस म्हणतात ( This is the most controversial statement in INDIA.... !!! ). तर ते असो...

 आणि आज त्याच आदर्शांना सर्वस्व मानून एक ७२ वर्षांचा म्हातारा (?) तुमच्या -- आमच्या साठी आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी एका भ्रष्टाचार मुक्त भारताच स्वप्न बघतोय...
आपल्या जीवाची पर्वा न करता थेट दिल्लीत आमरण उपोषण करतोय...... आणि आपण त्या बातम्या "News Channels" वर आपल्या घरात बसून निवांतपणे खात पीत बघतोय.... इतके कोडगे झालो आपण.....???

गांधी उपोषण करायचे तेव्हा जनताही आपल्या  घरात बसून जमेल तस उपास करायची, भगतसिहांनी जेल मध्ये उपोषण केल तेव्हाही हेच दृश्य होत .....
इंग्रज सरकारला जाग येईल म्हणून नव्हे तर आपल्यासाठी लढणाऱ्या या महात्म्यांच्या यातना ०.००१ % तरी आपण सहन करू शकू आणि सक्रीय नाही तर नाही भावनेच्या आधारे तरी त्यांच्या बरोबर राहू शकू यासाठी !!!
सकारात्मक भावनेत खूप मोठी ताकद असते हो !!!

अण्णांचा लढा यशस्वी होईल नाही होईल या पुढच्या गोष्टी झाल्या  पण त्यांना पाठींबा म्हणून आपणही थोडा पोटाला चिमटा काढू यात कि....
संपूर्ण दिवस उपाशी राहाण तर आपल्याला महाशिवरात्री किंवा आषाढीलाही जमत नाही ... पण एका भाकरीतली अर्धी भाकर तर आपण बाजूला ठेवू .....
तेवढंच पुण्य ..... अण्णांसाठी नाही तर या पुण्यसंचया साठी तरी जमवा हे !!!
आणि हो अशी पुण्य स्वर्गात COUNT होतात बर का..... !!!!



-- सारंग भोईरकर.....( हा लेख तुम्हाला पटला असेल तर जमेल तितक्या लोकांना पाठवा... कुठेतरी उपयोग होईलच.....)

1 comment: