शास्त्राप्रमाणे पृथ्वी ही जीवित आहे. वेद व्यासांनी ज्यावेळी महाभारत लिहिले त्यावेळी त्या मागे एक शास्त्रीय दृष्टीकोन होता हे माझ्या लक्षात आले आहे. बरेच वेळा महाभारत हे घडलेच नाही असे दावे करणारे लोक भेटतात किवा काही लोक त्यातील गोष्टीचे प्रमाण मागतात त्यावेळी काही गोष्टीना उत्तर असते काही प्रश्नांना उत्तर नसते. त्यावेळी त्या लोकांना एकच सांगावे वाटते कि जर तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांना मानतात तर तुम्हाला महाभारत आहे हे मान्य करावे लागेल आणि जर तुम्ही त्यांना देवाची उपाधी दिली आहे तर तुम्हाला त्यांनी केलेले चमत्कार किवा ज्या कथेत ते नायक होते ते सर्व तुम्हाला मान्य करावेच लागेल.
सर्वाच्या मते वेद व्यास हे जगातील सर्वात जास्त हुशार आणि काळाचा पुढचा विचार करणारे कवी होते. त्यांनी या त्यांच्या काव्यात जगातील सर्वच गोष्टीचा समावेश करून घेतला. माणसाचे गुण अवगुण त्याची एखाद्या परीस्थित वागण्याची पद्धत या सर्व गोष्टीचा महाभारतात उल्लेख होतो. पण मी एक घर अजून पुढे जाऊन म्हणेन त्यांनी त्यांच्या काव्य मध्ये विज्ञानाचा फार विचार केलेला दिसतो. मग तो कर्णचा वध असो किवा त्यांची पात्र रचना. त्यांनी जी काय नावे त्यांच्या कथेतील पात्रांना दिलेली आहेत ती माझ्या दृष्टीने आपले निसर्ग सोबत चे एक नाते सांगून जातात त्याच बरोबर शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा त्याला महत्व आहे. हा माझा विचार आहे , इतरांचे यावर वेगळे मत असू शकते.
वेद व्यासांनी जी पात्र रचना केलेली आहे किवा त्यांची नावे हि एका दृष्टीने पृथ्वी आणि पृथ्वीशी निगडीत असलेल्या इतर गोष्टीशी साम्य दाखवतात. उ.दा.
व्यासांनी कुंतीची पृथ्वीशी तुलना केली आहे किवा कुंती हि महाभारत पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते. लहान असताना कुंतीला दुर्वास ऋषींनी दिलेल्या वराची गोष्ट आपणा सर्वाना माहित आहेच. ती त्या मंत्राद्वारे कोणत्या पण देवाला आव्हान देऊ शकत होती. कुंतीला नेहमीच उगवत्या सूर्याचे कुतूहल वाटत असे. एकदा सूर्य कडे पाहत असताना तिला एक सुंदर पुरुष ज्याला दैवी कवच आणि सुंदरशी कुंडले होती. त्याला पाहून तिच्या तोंडून दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राचा जप केला गेला आणि साक्षात सूर्यदेव तिच्या समोर प्रकट झाले. सूर्यदेवाने तिला आपल्या सारखा एक पुत्र होईल असा वर दिला. कुंतीने ज्या मुलाला जन्म दिला त्याचे नाव कर्ण. त्या मुलाला जन्मजात कवच आणि कुंडले होती.
व्यासांनी कुंतीची पृथ्वीशी तुलना केली आहे किवा कुंती हि महाभारत पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते. लहान असताना कुंतीला दुर्वास ऋषींनी दिलेल्या वराची गोष्ट आपणा सर्वाना माहित आहेच. ती त्या मंत्राद्वारे कोणत्या पण देवाला आव्हान देऊ शकत होती. कुंतीला नेहमीच उगवत्या सूर्याचे कुतूहल वाटत असे. एकदा सूर्य कडे पाहत असताना तिला एक सुंदर पुरुष ज्याला दैवी कवच आणि सुंदरशी कुंडले होती. त्याला पाहून तिच्या तोंडून दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राचा जप केला गेला आणि साक्षात सूर्यदेव तिच्या समोर प्रकट झाले. सूर्यदेवाने तिला आपल्या सारखा एक पुत्र होईल असा वर दिला. कुंतीने ज्या मुलाला जन्म दिला त्याचे नाव कर्ण. त्या मुलाला जन्मजात कवच आणि कुंडले होती.
संस्कृतात "कुं - ती" चा अर्थ "पृथ्वी" असा होतो. कुंतीचे पूर्वीचे नाव पृथा असे होते. (ज्यावेळी ती राजा शूरसेनाच्या घरी होती. त्यानंतर तिला कुंतीभोज राजा कडे दत्तक देण्यात आले.). पृथा चा अर्थ पण पृथ्वी असाच होतो. या पृथ्वीवर कुठल्यापण जीवनाची सुरवात हि सूर्यकिरणांनीच होते. एखाद्या अंकुराचा जन्म होतो. कर्ण या शब्दाचा अर्थ थोडया फार प्रमाणात असाच होतो. कर्ण म्हणजे एखादे असे धान्य ज्याला टरफले किवा ज्यावर कसले तरी आवरण आहे (उ. दा. गहू किवा तांदूळ यांना ज्याप्रमाणे आवरण, गव्हासाठी सातू आणि तांदुळासाठी साळ) असा अंकुर जो या सर्व धान्य किवा वनस्पती जीवांचे प्रतिनिधित्व करतो. परंतु कुठल्या पण बीजाला अंकुर होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. कुंतीने आपल्या मुलाला पेटीमध्ये ठेऊन अश्व नदीच्या पाण्यात सोडून दिले. कर्ण त्यानंतर आदिरथ या सारथ्याला सापडला आणि त्याने त्याचे पालन पोषण केले. "आदि - रथ" चा अर्थ "शरीराची किवा देहाची चिंता" असा होतो.
कर्ण मोठा होऊन एक वीर योद्ध बनला. त्याचा अंगराज बनण्याची गोष्ट ही सर्वाना परिचयाची आहे. "अंग-राज" याचा अर्थ “शरीरावर राज्य करणारा”. कर्णाचे कवच हे संपूर्ण वनस्पती राज्यात ज्याप्रमाणे धान्य किवा फळावर एक संरक्षण करणारे आवरण असते त्याच्याशी साधर्म्य दाखवते आणि त्याची कुंडले ही झाडावर लागलेल्या फळासारखी वाटतात किवा साधर्म्य दाखवतात. कर्ण हा खूप दानशूर होता असे त्याच्या चरित्रामध्ये म्हंटले आहे. त्याने कधी कोणाकडे काही मागितले नाही. कोणी त्याजकडे काही मागितले तरी तो देत असे. त्याचप्रमाणे झाडे सुद्धा काहीही न बोलता प्राणीमात्रांना आपल्याकडील गोष्टी देतेच असतात.
कुंतीने आपल्याला मिळालेल्या वराचा उपयोग करून ३ मुलांना जन्म दिला . त्यांची नावे युधिष्ठीर , भीम आणि अर्जुन. त्याच वराचा उपयोग करून माद्रीने २ मुलांना जन्म दिला त्याची नावे नकुल आणि सहदेव. यातील युधिष्ठीर हा धर्माकडून, भीम हा वायू कडून, अर्जुन हा इंद्राकडून, नकुल आणि सहदेव हे अश्वनीकुमार कडून प्राप्त झाले. जर कुंती चा पहिला पुत्र (कर्ण) हा जर उर्जेचा स्त्रोत सूर्याकडून प्राप्त झाला आहे, जो संपूर्ण वनस्पती जीवनाशी साधर्म्य दाखवतो, त्याचप्रमाणे पांडव हे मनुष्यच्या शरीराचे विविध भागाचे प्रतिक आहेत असे मला वाटते. मनुष्य जो संपूर्ण प्राणीमात्रामध्ये सर्वोच स्थानी आहे.
युधिष्ठिर हा बुद्धी दर्शवतो, भीम- मन, अर्जुन-प्राण किवा श्वास दर्शवतो आणि जुळे बंधू नकुल आणि सहदेव हे हात आणि पाय दर्शवतात. त्यांचा जन्म एकमेकांच्या पाठोपाठ होतो, जसे कुठल्या पण लहान मुलाचा जन्म होतो त्याप्रमाणेच. मुलाचे पहिले डोके (हि बुद्धीची जागा आहे, म्हणजे युधिष्ठिर). त्यानंतर डोळे, भुवया, कपाळ हा भाग मन दर्शवते. (म्हणजेच भीम). त्यानंतर नाक, कान, किवा हृदय ज्यामुळे आपल्याला गोष्टी समजतात किवा प्राण (अर्जुन) हा असतो. त्यानंतर हात आणि त्यानंतर पाय हे नकुल आणि सहदेव यांच्याशी साधर्म्य दाखवतात.
वर मांडलेले विचार हे तुमचे लक्ष एक महत्वाच्या गोष्टीकडे वेधण्यासाठी आहेत. मनुष्याच्या आयुष्यात निसर्गाचे खूप महत्व आहे. कुठल्याना कुठल्या परीने आपण निसराग्वर अवलंबून असतो. त्यासाठी या निसर्गासोबत मनुष्याने एक समतोल राखून जीवन जगले पाहिजे. हाच एक महत्वाचा संदेश वेद व्यासाना आपल्या महाकाव्य महाभारतातून आपल्यला द्यायचा असेल.
खरच फारच सुंदर article आहे. महाभारत हे केवळ अध्यात्मिकच नवे तर वैज्ञानिक, मनोरंजन, काव्य, शिकवण सर्वच स्तरांवर उत्तम आहे. मनुष्याने जीवन कसे जगावे याचे उत्तम वर्ण यात आहे नि हजारो वर्षानंतर सुद्धा या गोष्टी जशाच्या तश्या लागू होतात. यातच व्यासांची दूरदृष्टी दिसून येते.
ReplyDeleteमहाभारतातील कोणताही पात्र घे अगदी तो युधिष्टिर असू दे कर्ण असू दे वा दुर्योधन, प्रत्येक पात्र मनुष्याचे विविध स्वभाव दर्शवतात आणि त्याबरोबरच नाते संबंधातील गुंतागुंत सुद्धा.
वा! महाभारतामधील पात्रांचा व कथेचा निराळ्या दृष्टीकोनातून विचार करून, या महाकाव्याकडे पाहाण्याची एक निराळीच दृष्टी तुम्ही वाचकांना दिलीत.
ReplyDelete