Thursday, April 14, 2011

If You Want to Say ‘No’ Say ‘NO’

When I was studying in SEED InfoTech one of our faculty named Amit Khedkar has taught us XML (If my seed friends are having problem in remembering him).  He was really a nice gentleman with lot of knowledge about the subject. On that day at the end if his session he told us about the few books which he would recommend us to read.
On that day he said something which I forgot in between time but I found it written in my notebook few days back. That sentence was “If you want to say ‘No’ say ‘NO’”.
Seriously it is that much difficult to say NO. If you ask me yes it is really difficult. The problem is that we are always trying to be nice to others at the expense of ourselves. By saying no we thought that we have hurt someone.
For example, whenever I get requests for help from someone, I would attend to them even though I had important work to do. Sometimes the requests would take more time. At the end of the day, I would have to work extra, spend more time to catch up on my work. This problem of not knowing how to say “no” also extended to my clients, colleagues, friends & family. The above mentioned example is not applicable for professional life, but applicable for my personal life also.
After sometime, I realised that all these times of not saying “no” (when I should) were not helping me at all. I was spending a lot of time and energy for other people and not spending nearly as much time for myself I slowly realised if I wanted personal time, I needed to learn to say “no”.


Why We Find it Hard to Say “No”

We have to first understand what is resisting us about saying “No”. Following are common reasons why people find it hard to say no:
  1. You Want to Help: You are really nice person. You are a kind soul at heart. You don’t want to turn the person away and you want to help where possible, even if it will consume your precious time.
  2. Afraid of Being Rude: Most of us brought up under the notion that saying “No”, especially to people who are more senior, is rude. May be this will affect my reputation or overall performance or the senior guy may feel disrespected.
  3. Saying Yes in Crowd: You don’t want to be eliminated yourself from the group because you are not in agreement with their decision. So you confirm to other’s requests.
  4. Fear of Conflict: You are afraid the person might be angry if you reject him/her. This might lead to an ugly situation. There may be future misunderstanding.  
  5. Fear of Lost Opportunities: Perhaps you are worried saying no means closing doors. There is fear of saying no to seniors may affect your appraisal or growth in the organization.
  6. Not Burning Bridges: Some people take “no” as a sign of rejection. It might lead to relationships severed or misunderstanding.
If you nodded to any of the above reasons, then you should started thinking on this front. If you will not started thinking on this side then it is going to be very difficult for you to balance between your personal and professional life. Saying “No” doesn’t mean you are being rude; neither does it mean you are being disagreeable. Saying “No” doesn’t mean there will be conflict nor that you will lose opportunities in the future. And saying no most definitely doesn’t mean you are burning bridges. These are all false beliefs in our mind.
At the end of the day, it’s about how you say “no”, rather than the fact you are saying no, that affects the outcome. After all, you have your own priorities and needs, just like everyone has his/her own needs. Saying no is about respecting and valuing your time and space. Say no is our right or its exclusive privilege.
When last time I wrote my article one of my friend suggested to me that instead of discussing problem give solutions. So here I am providing some of the solutions. They are not purely my thoughts. The solutions inspired from the books I read, discussions with my friends and personal experiences.

Simple Ways to Say “No”


Rather than avoid it altogether, it’s all about learning the right way to say no. Saying no to others is really not as bad as we thought. The fears of saying no are just in our mind.
Following are may be the few ways to say “NO”. If you have your own views or solutions then you can add/share your solutions or views.


1.  “I can’t commit to this as I have other priorities at the moment.”If you are too busy to engage in the request/offer, this will be applicable. This lets the person know that your full of work at the moment, so he/she should hold off on this as well as future requests. If it works, you can also share what you’re working on so the person can understand it better.

2.  “Now’s not a good time as I’m in the middle of something. How about we reconnect at X time?”It’s common to get sudden requests for help when you are in the middle of something. Sometimes I get phone calls from friends or associates when I’m in a meeting or doing important work. This method is a great way to (temporarily) hold off the request. First, you let the person know it’s not a good time as you are doing something. Secondly, you make known your desire to help by suggesting another time (at your convenience).

3.  “I’d love to do this, but …”Use this in a gentle way while saying no to the other party. It’s encouraging as it lets the person know you like the idea (of course, only say this if you do like it) and there’s nothing wrong about it, but I can’t take part in this due to some other reasons.

4.  “Let me think about it first and I’ll get back to you.”This is more like a “Maybe” than a straight out “No”. If you are interested but you don’t want to say ‘yes’ just yet, use this. This will help you in managing your work and also to manage your future work.

5.  “I’m not the best person to help on this. Why don’t you try X?”If you are being asked for help in something which you (i) can’t contribute much to (ii) don’t have resources to help. Let it be known they are looking at the wrong person. If possible, refer them to a lead they can follow-up on – whether it’s someone you know who can help them with their Problem. This things works in two ways. Without helping that person that person would appreciate your help.

6.  “No, I can’t.”The simplest and most direct way to say no. We build up too many barriers in our mind to saying no. Most of these barriers are self-created. Don’t think so much about saying no and just say it outright.


Learn to say no to requests that don’t meet your needs, and once you do that you’ll find how easy it actually is. You’ll get more time for yourself, your work and things that are most important to you. By saying only two letters is you are getting these much benefits then why we should start practicing it.

Thursday, April 7, 2011

लोकपाल विधेयक --- स्वातंत्र्याची दुसरी लढाई -- अण्णा हजारे !!!

पुढील लेख हा माझा office मधील मित्र सारंग याने लिहिलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया त्याला sarang.bhoirkar@gmail.com यावर कळवा...


"अब तक छप्पन" या सिनेमात नाना पाटेकरचा एक Dialogue आहे...
तो म्हणतो, "साला अपना रंडी जैसा है, एक कस्टमर गया तो दुसरा आने से पहिले पावडर, लाली
लगाके सुक सुक ...सुक सुक ... ऐसा आवाज देते बैठने का " !!!!
मला वाटत आपल्या भारतीय समाजाची अवस्था याहून काही वेगळी नाही...
१९४७ पासून आपण हेच तर करतोय किंवा आपल्याबरोबर केल जातंय..... आणि करणार दुसर-तिसर कुणीही नसून आपल मायबाप "भारत सरकार" आहे.... काही ठराविक वर्षांनी होणार्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हेच तर होत आलय....

इंग्रजीत एक म्हण आहे.... "When you cant resist the rape, enjoy it...."
आणि आपण एन्जॉय करायला शिकलो आहोत....किंवा आपल्यापुढे दुसरा पर्यायच उरला नाहीये.....

परिवर्तन, प्रबोधन, यांसारखे शब्द आता एकतर Dictionary त सापडतात किंवा समाजातल्या उच्चभ्रू  वर्गाने किंवा एखाद्या राजकारण्याने स्वतःचा काळा पैसा tax मधून वाचावा म्हणून उभारलेल्या "सामाजिक संस्थांची" नाव म्हणून दिसतात.

गेल्या काही वर्षात झालेल्या घोटाळ्यांमुळे तर भारताच नवं नामकरण "INDIA.... A Land Of Scams" अस करण्यास काहीच हरकत नसावी...
अरे घोटाळे करता का चेष्टा...??  2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची किंमत तर मला आकड्यांमध्ये लिहिताही येत नाही..... शाळेत गणित शिकविणार्या सरांनी "हि मध्यमवर्गीय पोर फार तर लाख किंवा करोड पर्यंत जाणार (अमेरिकेला वगैरे गेले तर...)" या हिशोबाने गणित शिकवलं.... त्यामुळे
हजार कोटी वगैरेची आकडेमोड आम्हाला जमण म्हणजे पुण्याचे आदर्श खासदार श्री. सुरेश कलमाडी सलग महिनाभर पुण्यात राहण्याइतक दुरापास्त !!!

पण आता वाटायला लागलय कि  घडू शकत काहीतरी...... २ एप्रिलला रात्री जसा अख्खा भारत एक झाला होता तितका नसेल पण थोडफार प्रत्येक जण अण्णांना पाठींबा देतोय आपापल्यापरीने.....facebook, twitter, या माध्यमांतून !!!

गेल्या महिन्यातच अण्णांची चिंचवडच्या डांगे चौकात एक सभा झाली; लोकपाल विधेयकाच्या प्रचारासाठी .... त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे अप्रतिम होते.....
१)  सगळ्यात आधी  त्यांनी याच्या आधीच आंदोलन जे "माहितीचा अधिकार" कायद्यासाठी केल होत त्याची माहिती देताना अस सांगितलं कि  उपोषणाच्या १२ व्या दिवशी मागण्या मंजूर झाल्या...१० वर्षे हा लढा चालू होता...
२) या अधिकारात भ्रष्टाचारी माणसाची माहिती मिळू शकते पण त्याला शिक्षा होण्याची यात तरतूद नाही....
३) म्हणून मग लोकपाल विधेयकाद्वारे या तरतुदी मांडण्यात आल्या ज्याला अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा ठाम विरोध आहे....
४) सरकारने "उपाय" म्हणून स्वतःच एक लोकपाल विधेयक मांडलं जे अतिशय कमकुवत आहे.
५) म्हणून जनतेन तयार केलेल्या लोकपाल विधेयकाची गरज आहे..
६) हल्लीचे राजकारणी एक साखळी तयार करतात... आधी सत्ता, मग त्यातून पैसा मग त्यातून परत    सत्ता.....    हि साखळी तोडायला हवी.....
७) आणि म्हणून अण्णांनी शेवटी या आंदोलनाच वर्णन "स्वातंत्र्याची दुसरी लढाई " अस केल.


सरकारने मांडलेल्या लोकपाल विधेयाकातल्या तरतुदिंकडून भ्रष्ट माणसाला शिक्षा होण्याची अपेक्षा करण म्हणजे नसबंदी केलेल्या पुरुषाकडून प्रजननाची अपेक्षा ठेवण्यासारख आहे....

जगातली  सर्वात मोठी लोकशाही समजल्या जाणार्या भारतीय संसदेत लोकपाल विधेयक तब्बल ४२ वर्षांपूर्वी मांडण्यात आल...
सर्वप्रथम १९६९ मध्ये लोकपाल विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं. तिथे ते मंजूरही झालं मात्र त्याला राज्यसभेत मंजूरी मिळाली नाही.
त्यानंतर १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ साली हे विधेयक मांडण्यात आले. मात्र अजूनही ते मंजूर झालं नाही.
सरकारच्या आणि भ्रष्ट अधिकारी व राजकारणी यांवर अंकुश ठेवू शकणारं विधेयक मंजूर व्हायला इतकी वर्ष लागावीत हि शरमेची नाही तर लांछनास्पद गोष्ट आहे.. आणि ते हि बरोबरच आहे म्हणा...लोकपाल विधेयक संसदेत राजकारण्यांपुढे मंजुरीसाठी ठेवण म्हणजे शिरीष कणेकरांच्या
भाषेत सांगायचं तर "दाउद इब्राहीमला स्मगलिंग विरोधी समितीचा अध्यक्ष हो अस म्हणण्यासारख आहे..."
आपण बलात्कार एन्जॉय करायला शिकलो आहोत अस मी म्हटलं न ते याचमुळे !!!!!

स्वातंत्र्यपूर्व काळात एक म्हातारा असाच वेड्यासारखा उपास वगैरे करून सत्याग्रह, अहिंसा या गोष्टी सांगत बसायचा...त्याने पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिल अस म्हणतात ( This is the most controversial statement in INDIA.... !!! ). तर ते असो...

 आणि आज त्याच आदर्शांना सर्वस्व मानून एक ७२ वर्षांचा म्हातारा (?) तुमच्या -- आमच्या साठी आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी एका भ्रष्टाचार मुक्त भारताच स्वप्न बघतोय...
आपल्या जीवाची पर्वा न करता थेट दिल्लीत आमरण उपोषण करतोय...... आणि आपण त्या बातम्या "News Channels" वर आपल्या घरात बसून निवांतपणे खात पीत बघतोय.... इतके कोडगे झालो आपण.....???

गांधी उपोषण करायचे तेव्हा जनताही आपल्या  घरात बसून जमेल तस उपास करायची, भगतसिहांनी जेल मध्ये उपोषण केल तेव्हाही हेच दृश्य होत .....
इंग्रज सरकारला जाग येईल म्हणून नव्हे तर आपल्यासाठी लढणाऱ्या या महात्म्यांच्या यातना ०.००१ % तरी आपण सहन करू शकू आणि सक्रीय नाही तर नाही भावनेच्या आधारे तरी त्यांच्या बरोबर राहू शकू यासाठी !!!
सकारात्मक भावनेत खूप मोठी ताकद असते हो !!!

अण्णांचा लढा यशस्वी होईल नाही होईल या पुढच्या गोष्टी झाल्या  पण त्यांना पाठींबा म्हणून आपणही थोडा पोटाला चिमटा काढू यात कि....
संपूर्ण दिवस उपाशी राहाण तर आपल्याला महाशिवरात्री किंवा आषाढीलाही जमत नाही ... पण एका भाकरीतली अर्धी भाकर तर आपण बाजूला ठेवू .....
तेवढंच पुण्य ..... अण्णांसाठी नाही तर या पुण्यसंचया साठी तरी जमवा हे !!!
आणि हो अशी पुण्य स्वर्गात COUNT होतात बर का..... !!!!



-- सारंग भोईरकर.....( हा लेख तुम्हाला पटला असेल तर जमेल तितक्या लोकांना पाठवा... कुठेतरी उपयोग होईलच.....)

Tuesday, April 5, 2011

महाभारत - एक शास्त्रीय दृष्टीकोन

शास्त्राप्रमाणे पृथ्वी ही जीवित आहे. वेद व्यासांनी ज्यावेळी महाभारत लिहिले त्यावेळी त्या मागे एक शास्त्रीय दृष्टीकोन होता हे माझ्या लक्षात आले आहे. बरेच वेळा महाभारत हे घडलेच नाही असे दावे करणारे लोक भेटतात किवा काही लोक त्यातील गोष्टीचे प्रमाण मागतात त्यावेळी काही गोष्टीना उत्तर असते काही प्रश्नांना उत्तर नसते. त्यावेळी त्या लोकांना एकच सांगावे वाटते कि जर तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांना मानतात तर तुम्हाला महाभारत आहे हे मान्य करावे लागेल आणि जर तुम्ही त्यांना देवाची उपाधी दिली आहे तर तुम्हाला त्यांनी केलेले चमत्कार किवा ज्या कथेत ते नायक होते ते सर्व तुम्हाला मान्य करावेच लागेल.

सर्वाच्या मते वेद व्यास हे जगातील सर्वात जास्त हुशार आणि काळाचा पुढचा विचार करणारे कवी होते. त्यांनी या त्यांच्या काव्यात जगातील सर्वच गोष्टीचा समावेश करून घेतला. माणसाचे गुण अवगुण त्याची एखाद्या परीस्थित वागण्याची पद्धत या सर्व गोष्टीचा महाभारतात उल्लेख होतोपण मी एक घर अजून पुढे जाऊन म्हणेन त्यांनी त्यांच्या काव्य मध्ये विज्ञानाचा फार विचार केलेला दिसतो. मग तो कर्णचा वध असो किवा त्यांची पात्र रचना. त्यांनी जी काय नावे त्यांच्या कथेतील पात्रांना दिलेली आहेत ती माझ्या दृष्टीने आपले निसर्ग सोबत चे एक नाते सांगून जातात त्याच बरोबर शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा त्याला महत्व आहे. हा माझा विचार आहे , इतरांचे यावर वेगळे मत असू शकते.
                                       
वेद व्यासांनी जी पात्र रचना केलेली आहे किवा त्यांची नावे हि एका दृष्टीने पृथ्वी आणि पृथ्वीशी निगडीत असलेल्या इतर गोष्टीशी साम्य दाखवतात. .दा.

व्यासांनी कुंतीची पृथ्वीशी तुलना केली आहे किवा कुंती हि महाभारत पृथ्वीचे प्रतिनिधित्व करतेलहान असताना कुंतीला दुर्वास ऋषींनी दिलेल्या वराची गोष्ट आपणा सर्वाना माहित आहेच. ती त्या मंत्राद्वारे कोणत्या पण देवाला आव्हान देऊ शकत होती. कुंतीला नेहमीच उगवत्या सूर्याचे कुतूहल वाटत असे. एकदा सूर्य कडे पाहत असताना तिला एक सुंदर पुरुष ज्याला दैवी कवच आणि सुंदरशी कुंडले होती. त्याला पाहून तिच्या तोंडून दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राचा जप केला गेला आणि साक्षात सूर्यदेव तिच्या समोर प्रकट झाले. सूर्यदेवाने तिला आपल्या सारखा एक पुत्र होईल असा वर दिला. कुंतीने ज्या मुलाला जन्म दिला त्याचे नाव कर्ण. त्या मुलाला जन्मजात कवच आणि कुंडले होती.


  


संस्कृतात "कुं - ती" चा अर्थ "पृथ्वीअसा होतो. कुंतीचे पूर्वीचे नाव पृथा असे होते. (ज्यावेळी ती राजा शूरसेनाच्या घरी होती. त्यानंतर तिला कुंतीभोज राजा कडे दत्तक देण्यात आले.). पृथा चा अर्थ पण पृथ्वी असाच होतो. या पृथ्वीवर कुठल्यापण जीवनाची सुरवात हि सूर्यकिरणांनीच होते. एखाद्या अंकुराचा जन्म होतोकर्ण या शब्दाचा अर्थ थोडया फार प्रमाणात असाच होतो. कर्ण म्हणजे एखादे असे धान्य ज्याला टरफले किवा ज्यावर कसले तरी आवरण आहे (. दा. गहू किवा तांदूळ यांना ज्याप्रमाणे आवरण, गव्हासाठी सातू आणि तांदुळासाठी साळ) असा अंकुर जो या सर्व धान्य किवा वनस्पती जीवांचे प्रतिनिधित्व करतो. परंतु कुठल्या पण बीजाला अंकुर होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. कुंतीने आपल्या मुलाला पेटीमध्ये ठेऊन अश्व नदीच्या पाण्यात सोडून दिले. कर्ण त्यानंतर आदिरथ या सारथ्याला सापडला आणि त्याने त्याचे पालन पोषण केले. "आदि - रथ" चा अर्थ "शरीराची किवा देहाची चिंता" असा होतो.



 कर्ण मोठा होऊन एक वीर योद्ध बनला. त्याचा अंगराज बनण्याची गोष्ट ही सर्वाना परिचयाची आहे. "अंग-राज" याचा अर्थशरीरावर राज्य करणारा”. कर्णाचे कवच हे संपूर्ण वनस्पती राज्यात ज्याप्रमाणे धान्य किवा फळावर एक संरक्षण करणारे आवरण असते त्याच्याशी साधर्म्य दाखवते आणि त्याची कुंडले ही झाडावर लागलेल्या फळासारखी वाटतात किवा साधर्म्य दाखवतात. कर्ण हा खूप दानशूर होता असे त्याच्या चरित्रामध्ये म्हंटले आहे. त्याने कधी कोणाकडे काही मागितले नाही. कोणी त्याजकडे काही मागितले तरी तो देत असे. त्याचप्रमाणे झाडे सुद्धा काहीही बोलता प्राणीमात्रांना आपल्याकडील गोष्टी देतेच असतात.

कुंतीने आपल्याला मिळालेल्या वराचा  उपयोग करून  मुलांना जन्म दिला . त्यांची नावे  युधिष्ठीर , भीम आणि अर्जुन. त्याच वराचा उपयोग करून माद्रीने मुलांना जन्म दिला त्याची नावे नकुल आणि सहदेव. यातील युधिष्ठीर हा धर्माकडून, भीम हा वायू कडून, अर्जुन हा इंद्राकडून, नकुल आणि सहदेव हे अश्वनीकुमार कडून प्राप्त झाले. जर कुंती चा पहिला पुत्र (कर्ण) हा जर उर्जेचा स्त्रोत सूर्याकडून प्राप्त झाला आहे, जो संपूर्ण वनस्पती जीवनाशी साधर्म्य दाखवतो, त्याचप्रमाणे पांडव हे मनुष्यच्या शरीराचे विविध भागाचे प्रतिक आहेत असे मला वाटते. मनुष्य जो संपूर्ण प्राणीमात्रामध्ये सर्वोच स्थानी आहे.

युधिष्ठिर हा बुद्धी दर्शवतो, भीम- मन, अर्जुन-प्राण किवा श्वास दर्शवतो आणि जुळे बंधू नकुल आणि सहदेव हे हात आणि पाय दर्शवतात. त्यांचा जन्म एकमेकांच्या पाठोपाठ होतो, जसे कुठल्या पण लहान मुलाचा जन्म होतो त्याप्रमाणेच. मुलाचे पहिले डोके (हि बुद्धीची जागा आहे, म्हणजे युधिष्ठिर). त्यानंतर डोळे, भुवया, कपाळ हा भाग मन दर्शवते. (म्हणजेच भीम). त्यानंतर नाक, कानकिवा हृदय ज्यामुळे आपल्याला गोष्टी समजतात किवा प्राण (अर्जुन) हा असतो. त्यानंतर हात आणि त्यानंतर पाय हे नकुल आणि सहदेव यांच्याशी साधर्म्य दाखवतात.


वर मांडलेले विचार हे तुमचे लक्ष एक महत्वाच्या गोष्टीकडे वेधण्यासाठी आहेत. मनुष्याच्या आयुष्यात निसर्गाचे खूप महत्व आहे. कुठल्याना कुठल्या परीने आपण निसराग्वर अवलंबून असतो. त्यासाठी या निसर्गासोबत मनुष्याने एक समतोल राखून जीवन जगले पाहिजे. हाच एक महत्वाचा संदेश वेद व्यासाना आपल्या महाकाव्य महाभारतातून आपल्यला द्यायचा असेल.