Wednesday, July 13, 2011

अपेक्षाभंग


"अपेक्षाभंगाचे दु: मोठे असते."
 
सारंगची माझ्या मागच्या article वरची comment.  खरेच असे आहे का? या गोष्टीच आपणा खरेच विचार करायला पाहिजे.
जगात -याचशा अश्या गोष्टी असतात ज्याचा विचार करणे आपण गरजेचे असते, पण त्या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही किवा त्या गोष्टीची आपण काळजी करत नाही.
या विषयावर जेव्हा मी जरा विचार केला त्यावेळी लक्षात आले-याचशा दुखांचे, चिंतांचे कारण हा अपेक्षाभंगच  आहेकदाचित अनेक लोक माझ्या या वक्तव्यावर त्यांची नापसंती दर्शवतील पण हे एका दृष्टीने काही बाबतीत खरे आहे

आपल्या दैनदिन जीवनात आपला किती वेळा अपेक्षाभंग होतो ??? 

अपेक्षाभंग या शब्दाचा अर्थ आपण नीट समजून घायला हवा असे मला वाटतेअपेक्षा म्हणजे Expectation. माणूस एखाद्याकडून कुठल्यातरी गोष्टीची अपेक्षा करतो म्हणजे काय?
तो एक विश्वास आहे. ती अपेक्षित गोष्ट पूर्ण होण्याचाअपेक्षा हा एक विचार आहे जो माणसाला एकमेकांशी जोडतो. अपेक्षाभंग हा शब्द एक विश्वासघात दर्शवतो असे मला वाटते. (कदाचित या ठिकाणी विश्वासघात हा शब्द  जरा कठोर  वाटला असेल तर मी क्षमस्व आहे..). 


यासाठी मी काही उदाहरणे देऊ इच्छितो.
समजा तुम्ही खूप आजारी आहात. तुमच्या office  चे  मित्रामैत्रीनीने तुम्हाला phone केला  आणि  त्यांनी तुमच्या तब्येतीची विचारपूस करता तुम्हाला office मध्ये किती काम आले आहे, त्यामुळे आपल्याला कश्या पद्धतीने overtime  करावा लागेल किंव कोणकोणाचे भांडण झाले याबद्दल जर सांगितले तर आपल्याला वाईट वाटते. आपण मित्राकडून  ठेवलेली अपेक्षा पूर्ण होत नाही त्यामुळे त्या ठिकाणी आपला  अपेक्षाभंग झालेला असतो.
हे उदाहरण तुम्हाला फारच काल्पनिक वाटत असेल किवा व्यवहाराला सोडून वाटत असेल तर अजून उदाहरणे देतो.

May be हे बहुतांशी  लोकांसोबत झाले असेल. तुम्ही एकाद्या job च्या interview साठी जातात. तुम्ही inteview  मध्ये जी काही उत्तरे दिलेली असतात आणि समोरच्या माणसाच्या वागणुकीवरून तुम्हाला लक्षात आलेले असते कि तुम्हाला हा job  मिळणार आहे कि नाही. कदाचित तुम्हाला निकाल आधीच माहित असतो. Interview झाल्यावर तो मनुष्य तुम्हाला म्हणतो "HR will get back to you for further process(or with the result)". झाले. आपण अपेक्षा लाऊन बसतो. आज phone येणार किवा mail येणार. पण तसे काही होत नाही. उलट शेवटी हाती येते ती निराशा....

एक अजून उदाहरण:
तुमची प्रेयसी किवा प्रियकर तुम्हाला भेटायला येणार आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीची/प्रियकराची  वाट पाहत आहात. तुम्ही तिच्यासाठी भेट वस्तू आणल्या आहेत. खूप काही surprises plan केले आहेत. Movie  ला जायचा पण plan  fix  आहेतुमची अपेक्षा असते कि आजचा दिवस हा तुम्ही आणि तुमच्या सोबतच्या व्यक्तीने आयुष्यभर  लक्षात ठेवावा. पण तेवढ्यात तिचा/त्याचा फोन  येतो (नाहीतर एक छोटासा SMS, 'I cnt come.' कधी कधी तर फोन किवा SMS पण येत नाही मनुष्य मूर्ख सारखा वाट पाहत बसतो...) कि आज मला येणे शक्य नाही. "I Hope you will understand... Sorry... "  बस फक्त Sorry....  इतके बोलून समोरचा फोन  ठेऊन देतो. झाले. खरेच इतके सोपे असते का  हो समोरच्याच्या भावना दुखावणेएक sorry म्हटल्याने सर्व गोष्टी नीट होतात का?
त्या थोड्याश्या वेळात त्याने किवा तिने रंगवलेली स्वप्ने, ठरवलेले सर्व plans एका मिनिटामध्ये धुळीला मिळाले असतात. त्या सर्वाची भरपाई त्या एका sorry  ने होणार आहे का?



वरील सर्व घटनाक्रम मध्ये मनुष्याचा सगळ्यात मोठा दोष आहे कि तो स्वप्न पाहतो. खरेतर याला  दोष म्हणता येणार नाहीस्वप्न पाहणे हा एक मानवी गुणधर्म आहे. पण मनुष्य नुसते स्वप्न पाहत नाही तो ती पूर्ण करण्याच्या मागे लागतो. काही स्वप्ने पूर्ण करणे हितावह असते, कधी कधी ते गरजेचे सुद्धा असते. -याच वेळा मनुष्य पूर्ण होणारी किवा आपल्या आवाक्या बाहेरची स्वप्ने पाहतोआणि ते स्वप्न पाहून ते पूर्ण होण्याची आशा मनाशी बाळगतो, आणि मग ती स्वप्ने पूर्ण करण्याच्या नादात वाहवत जातो, सरते शेवटी आयुष्याचे नुकसान करून घेतो.

माझ्या office मधल्या एक मित्राने त्याच्या एका मित्राची गोष्ट मला सांगितली होतीत्या मुलाने असेच एक स्वप्न पहिले. त्याला एक मुलगी आवडत होती पण ती मुलगी त्याला एक चांगला मित्र समजत होती आणि ती आधीच committed relationship मध्ये होती. ह्या गोष्टीची त्या मुलाला पूर्ण जाणीव होती. तरी सुद्धा मला तिच मुलगी आवडते असे म्हणून त्याने आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने तो पाहू लागला.  तिच्या कडून नकार येणे अपेक्षित होते आणि तसा तो आला सुद्धा.... पण त्या मुलाने पाहिलेल्या स्वप्नाचे काय ? त्याला एक वेडी आशा किवा अपेक्षा होती कि ती 'हो' म्हणेल आणि तिथेच तो चुकला. त्यांच्या अपेक्षेचा भंग तिथे झालापण अश्या प्रकारच्या अपेक्षा का कराव्यात ज्या पूर्ण होणार नाहीत. या स्वप्नांमध्ये तो मुलगा इतका वाहवत गेला कि त्याने आपले आयुष्य, career सर्वच बरबाद करून घेतले. या वरील प्रकरणामध्ये त्या मुलीचा काही दोष नाही असे मला वाटते. कारण ती तिच्या बाजूने clear होती. चूक त्या मुलाची आहे कि त्याने नको ती अपेक्षा केली.

या गोष्टीवर माझ्या एका मित्राचे मत थोडे वेगळे होते. तो म्हणाला कि आपण अपेक्षाच  ठेऊ नये म्हणजे अपेक्षाभंगाचा प्रश्नच येत नाही. हे फार practical  बोलणे झाले. पण खरे पाहता, असे वागणे सोपे नाही. FRIENDS या TV Series  मधील JOEY या character एका भागात  पुढील वाक्य म्हटले आहे.

"You can not found a single selfless good deed."

Serial  मध्ये जरी ह्या वाक्याचा उपयोग विनोदनिर्मितीसाठी केला गेला असेल तरीपण त्यामागील अर्थाचा वेगळ्या दृष्टीने विचार करणे योग्य राहील.



मानवी स्वभावाच  आहे कि तो नेहमी कुठल्या कुठल्या स्वार्थासाठी कामे करत असतो. (या ठिकाणी कृपया स्वार्थ या शब्दाचा अर्थ चुकीचा किवा वाईट असा घेऊन नका). स्वार्थ अनेक गोष्टी मध्ये असू शकतो. या ठिकाणी आपल्याला स्वार्थ या शब्दाचा एक वेगळा अर्थ जाणून घ्यावा लागेल.
उदा:
मी नोकरी करतो या मागे माझा स्वार्थ पैसे कमावणे हा आहे.
मी कोणत्या तरी मित्राला त्याच्या वाईट काळात मदत केली या मागे कदाचित माझा स्वार्थ असा असू शकतो कि मी मैत्रीचे कर्तव्य पार पाडले आणि त्याच बरोबर पुढे माझ्यावर वाईट वेळ आल्यास तो मला मदत करेल.
कोणी माझ्या घरी आले, मी त्यांची चांगली खातरदारी केली. माझी अपेक्षा असणार कि त्यांनी मला निमंत्रण दिल्यास मी पण त्यांच्या कडून तश्याच आदरतिथ्याची अपेक्षा ठेवेल.
माणूस लग्न करतो त्यामागे त्याचा काय स्वार्थ असू शकणार आहे का? नाही ते एक पवित्र बंधन आहे... तरी पण माझा एकटेपणा जाइल... समाजाने सांगितलेले एक कर्तव्य किवा आई वडिलांच्या आनंदासाठी... किवा आयुष्यभरासाठी  कोणाची तरी सोबत असावी... ह्याला स्वार्थ म्हणता येणार नाही पण काहीतरी कारण आहे ज्यामुळे आपण लग्न करतो.
इतकेच  काय जर आपण देव दर्शनाला जरी गेलो तरी आपल्याला मनातील इच्छा आपण देवासमोर बोलून दाखवतो. ती इच्छा पूर्ण केल्यास आपण देवाला नैवैद्य किवा नवस करू असे कबूल करतोदेवाकडे काही मागणे हे चुकीचे नाही. पण कुठले तरी देवकार्य करताना आपली हि इच्छा पूर्ण होईल हा हि एक प्रकारचा स्वार्थच आहे. भले मग तो स्वार्थ मन शांतीचा का असेना..
काही लोकांचा स्वभाव मुळात स्वार्थी असतो त्यामुळे त्यांनी केलेल्या  प्रत्येक गोष्टीतून कुठल्या तरी फळाची अपेक्षा ठेवतातकाही लोक निस्वार्थीपणे काही कार्य करतात  त्यामागे सुद्धा मी या लोकांना मदत करत आहे हि भावना कुठे ना कुठे मनात असते आणि त्या मदतीसाठी मला काहीतरी मिळेल हि अपेक्षा पण असतेच.
असो. अपेक्षा करणे चुकीचे आहे असे माझे  म्हणणे बिलकुल नाही. पण ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या आयुष्याचा -हास करून  हे घेणे चुकीचे. मनुष्याने प्रथम कोणाकडून अपेक्षा ठेवावी हे ठरवावे आणि खरच ती व्यक्ती त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या लायकीची आहे का याचा शोध घ्यावा. जर ती व्यक्ती तुमच्या अपेक्षा पूर्ण करत असेल तर तुम्ही हे विसरू नये त्याच बरोबर त्या व्यक्तीच्या पण अपेक्षा तुम्ही पूर्ण कराव्या अशी समोरच्याची इच्छा असते. At end what is relationship? It is just an mutual understanding between two human beings. (Oscar Wild चे या बाबतीतच एक आणखी मत आहे जे लग्न या विषय संदर्भात आहे  “A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding.असो. ते त्याचे मत आहे.) शेवटी एखादा माणूस किती किती त्रास सहन करू शकतो हे त्याच्या मानसिक शक्ती वर अवलंबून आहे. पण एक नक्की आहे मनुष्य किती जरी मानसिकदृष्ट्या खंबीर असला तरी स्वप्न तुटली किवा अपेक्षाभंग झाला तर त्याला (थोडातरी) त्रास होणारच..........

6 comments:

  1. छान जमलाय लेख हर्षल,
    मला वाटत कि हि न तुटणारी साखळी आहे.
    माणूस अपेक्षा करतो..ती भंग पावते...मग त्रास होतो.
    पण यातून काही शिकण्यापेक्षा पुढच्या वेळेला माणूस परत तेच करतो..फक्त या वेळेस अपेक्षा
    वेगळ्या गोष्टीसाठी असते..पण दुख तेच...!!!
    शेवटी हा मानवी स्वभाव आहे कि अपेक्षा म्हणजे स्वार्थ आणि त्यातून येणार नैराश्य....
    फक्त हे मात्र खर कि माणसाची मानसिक ताकद इथे खूप कामाला येते जिच्याद्वारे तो या नैराश्यावर मात करू शकतो.
    आणि तेच जास्त महत्वाच असत नाही का?

    ReplyDelete
  2. धन्यवाद सारंग
    या ठिकाणी मी तुझे दोनदा आभार मानायला हवे....
    एक प्रतिक्रियेसाठी आणि दुसरे या लेखाची कल्पना देण्यासाठी....
    तू जे म्हणाला ते खरेच आहे......
    माणसाने आपल्या पूर्वानुभवातून शिकावे.... आणि त्याचा उपयोग भावी आयुष्यासाठी करावा..
    पण मनुष्य नेमके तेच करत नाही आणि दु:ख ओढावून घेतो..

    ReplyDelete
  3. अभिनंदन हर्षल..नेहमीप्रमाणे हा ब्लॉग पण खूपच छान आहे..पण तुझ्या office मधल्या एक मित्राने त्याच्या एका मित्राची गोष्ट मला सांगितली त्यात मला त्या मुलाची चूक वाटते..त्याला जर हे माहित आहे कि ती आधीपासून relationship मध्ये आहे तरी पण त्याने अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.. हा सरासर मूर्खपणा म्हणावा लागेल. आणि जरी अपेक्षाभंग झाला तरी त्याने खचून जाऊन स्वताचे आयुष्य बरबाद करून घेण्यात काही तथ्य नाही. उलट त्याने खुश झाले पाहिजे कि तिने व त्याने एकत्र इतके दिवस छान घालवले. असो. मला इतकेच म्हणायचे आहे कि कधी कधी practicle विचार करणे सुद्धा खूप महत्वाचे असते. नेहमी emotional होऊन चालणार नाही. तुझ्या पुढच्या लेखासाठी शुभेछा!!!!!

    ReplyDelete
  4. धन्यवाद कपिल
    तू दिलेली प्रतिक्रिया फारच छान आहे.
    आणि त्या मुला बद्दल बोलायचे झाल्यास त्या मुलाची चुकी होती यात वाद नाही.
    ठीक आहे मी मान्य करतो कि प्रेम हे होऊ शकते पण माझा प्रेमभंग झाला म्हणून माझे कौटुंबिक किवा व्यवहारिक जीवन मी का धुळी ला मिळऊ..
    तो एक जुना अनुभव समजून सोडून द्याला पाहिजे. माणूस तेच तर करतो भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टीवर तो वर्तमानात चिंता करत बसतो आणि भविष्याची वाट लाऊन घेतो.

    ReplyDelete
  5. मस्त लिहिला आहेस हर्शल.
    अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेल प्रयत्न हे महत्वाचे आहेत.

    ReplyDelete
  6. “I do my thing and you do yours. I am not in this world to live up to your expectations, and you are not in this world to live up to mine. You are you and I am I, and if by chance we find each other, then it is beautiful. If not, it can't be helped.”
    Gestalt prayer.

    bUT i THINK The best things in life are unexpected - because there were no expectations.Expect the best of yourself, and then do what is necessary to make it a reality.

    ReplyDelete