स्थळ: पुष्पा हॉटेल, कर्वे नगर.
दिनांक: १३-७-२००१
वेळ: संध्याकाळी ७:३०
पात्रे: कपिल, दीपक, रश्मी आणि मी
वेळ: संध्याकाळी ७:३०
पात्रे: कपिल, दीपक, रश्मी आणि मी
चहा ची order देऊन बराच वेळ झाला होता. माझ्या संयमाची जागा आता रागाने घेतली होती. नेहमी प्रमाणे मी picture च्या गोष्टी करत होतो, दीपक शांतपणे ऐकत होता (तो ते नेहमीच करतो.). कपिल आणि रश्मी कुठल्या तरी ह्रितिक रोशनच्या topic वरून भांडत होते. (नेहमी प्रमाणे त्यांच्या भांडणाला काही अर्थ नव्हता.)
अचानक कपिल म्हणाला " मुंबईत bomb blast झाला आहे ." आम्ही सर्वेच्या सर्व स्तब्ध झालो. लगेच फोनाफानी सुरु झाली. कपिल ने लगेच मित्राला sms forward केला, मित्राला phone केला कि news खरी आहे का?
रश्मीने पण आपल्या वडलाना फोन केला. मी सुद्धा घरी phone केला. सगळ्यांनी विचारपूस केली. कपिलचे काका त्यावेळी मुंबईला गेले होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार दादर परिसरात bomb blast झाला होता. ते भिवंडी परिसरात होते त्यामुळे काळजीचे तसे कारण नव्हते तरी त्याने त्यांचा खुशालीची खात्री करून घेतली. माझ्यापण वडलांनी मला सूचना केल्या व phone ठेवला. मी घरी बोलत असताना मला मध्येच कपिल ने प्रश्न विचारला "किती bomb blast झाले? तीन का चार? किती मेले?" मी त्याला उत्तर दिले अजून काही आकडा आलेला नाही परंतु आता तरी tv वर ११ दाखवत आहेत. त्याने ती माहिती फोन द्वारे त्याच्या मित्राला कळवली. Now it was confirm.
फक्त दोन मिनिटांनंतर "We are back to our discussion." मी रात्रीच्या जेवणाबद्दल discuss करत होतो. दीपक शांत होता. रश्मी माझ्याशी बोलत होती मध्येच घरच्यांचा फोन तर कधी होणा-या नव-याचा... कपिलचे फोन आणि sms सुरूच होते. तेव्हा तो म्हणाला, अरे कप्या म्हेत्रे (अजून एक मित्र) चा फोन होता तो म्हणत होता "काय लेचे-पेचे bomb फोडत आहेत हे आतंकवादी. फक्त ११ च मेले." त्यानंतर आम्ही जेवणाच्या चर्चेत होतो. तरीपण कुठे तरी एक विचार डोक्यातून जात नव्हता आणि अचानक मी बोललो "एक मिनिट तुम्हाला नाही वाटत आपल्या सर्वांच्या संवेदना खूपच बोथट झाल्या आहेत." दीपक आणि कपिल माझ्या बोलण्याने विचारात पडले. रश्मीला as usual मी काय म्हणालो ते समजलेच नाही.
"म्हणजे": रश्मी
"म्हणजे आता हा bomb blast झाला आहे आणि आपल्याला त्याने काही फरक नाही पडत. आपण किती सराईतपणे विषय बदलला. ": मी
"अरे हो मला पण तेच वाटले. पण तुम्ही सर्व जेवणाच्या आणि picture च्या गोष्टी करत होते त्यामुळे मी काही बोललेच नाही": रश्मी
"नाही खरेच आपण या सर्व गोष्टी खूपच casually घेतो असे नाही वाटत का तुम्हाला?": मी
"हो रे तू म्हणतो ते खरे आहे, मला पण वाईट वाटले.": कपिल
"आपण काय केले, सगळ्यांनी घरी फोन करून confirm केले. मला असे वाटते आपण खूप असे संकुचित जीवन जगत आहोत. " :मी
मी पुढे काही बोलणार तेवढ्यात चहा आला. हॉटेल चा चहा चांगला पण service एकदम बकवास या विषयावर मग चर्चा सुरु झाली.
चहा घेऊन झाल्यावर आम्ही उठलो. त्यावेळी प्रत्येकजण घरी जाण्याची घाई करत होता. आम्हा सर्वाना TV वर या बाबतीत काय चालू आहे याचा 'आखोदेखा' हाल पहायचा होता.
स्थळ: Room
रूमचे दर उघडल्याबरोबर light लागायच्या आत TV लागला होता. हे तिन्ही रूमवर आल्याबरोबर TV च्या समोर बसले होते. तिघेही जण अतिशय एकाग्र होऊन TV पाहत होते. TV वरची दृश्ये पाहून त्यांना खूप वाईट वाटत होते. त्या कृत्याबद्दलचा राग, संताप त्याच बरोबर तिथल्या लोकांबद्दल कीव, दया त्यांच्या डोळ्यात दिसत होती. मला खरेच प्रश्न पडला कि खाली हॉटेल मध्ये ज्या लोकांना मी संवेदना या विषयावर बोलत होता (एकीला तर संवेदना म्हणजे काय ते माहित नव्हते काय करणार convent चे शिक्षण...). पण कदचित मला त्यांना सांगायची गरज वाटली नाही. त्यांच्या डोळ्यात तरळणारे ते भाव सगळे सांगून जात होते. त्यांना या सर्व गोष्टीबद्दल वाटणारी आत्मियत आणि चीड त्यांच्या चेह-यावर दिसत होती.
स्थळ : Office
दिनांक: १४-७-२०११
वेळ: सकाळी
सकाळी मी office ला जरा जास्तच लवकर आलो होतो. ब-याच वेळ मी एकटा बसलो होता. कालच्या बॉम्बहल्ल्याची बातमी अजून पण मनात होती. थोड्या वेळानंतर लोक यायला सुरु झाले. अभय आल्यावर म्हणाला "काल काय danger झाले. किती लोक मेले याचा तर पत्ताच नाही. खरे तर जे news मध्ये दाखवतात ती संख्या खूपच कमी आहे. असलीयत मध्ये तिथे मरणा-याची संख्या खूप जास्त आहे. कमीत कमी १०० च्या वर तरी लोक मेले असतील. News channel वाले चुकीचे आकडे सांगत आहेत."
"तो सरकारी आकडा आहे अभय. सरकार मुद्दाम कमी आकडा दाखवते आहे. मला तर वाटते कि २००-३०० तरी मेले असतील, कारण स्टेशन जवळच्या भागात ब्लास्ट झाला." : मी
"आपण किती सहज म्हणून टाकतो ना २००-३०० मेले त्यात एक जरी आपल असले तेव्हा कळते??" : शिल्पा
शिल्पाच्या या वाक्यावरून पुन्हा एकदा लक्षात आले कि आपल्याला त्या गोष्टीची जाणीव तो पर्यंत होणार त्या गोष्टीची झळ आपल्याला पोहचणार नाही. माणूस स्वार्थी झाला आहे असे नाही पण त्याने स्वतःला एका आपल्या स्वतंत्र अश्या जगात गुरफटून घेतले आहे.
तितक्याच सारंग** आला.
"मी काल रात्री माझ्या दादरला राहणा-या मित्रांना फोन करण्याचा प्रयत्न करत होतो पण लागलाच नाही शेवटपर्यंत ....": सारंग
आणि त्याने आमच्या समोर पुन्हा एकवार फोन लावला. २-३ प्रयत्नानंतर शेवटी फोन लागला. सारंगचा मित्र ठीक होता.
त्यांच्यात झालेल्या संभाषणाचा हा सारांश सारंगने सांगितलेला.....
"मुंबई चे लोक आता या गोष्टीला used to झाले आहेत. त्यांना याने काही फरक पडत नाही. त्या मित्राच्या शेजारच्या काकांनी सांगितले 'इतका काही आवाज नाही झाला. मागल्यावेळी खूप आवाज आला होता. माझ्या गाडीला पण काही झाले नाही.' मित्राने पुढे हे पण सांगितले कि जिथे bomb blast झाला होता त्याच्या बाजूच्या रस्त्याने traffic नीट चालू होती. माणसे एकदम शिस्तीत गाडी चालवत होती. एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळी bomb blast झाला ती वेळ संध्याकाळची होती, गर्दीची होती. त्यावेळी स्टेशन च्या जवळ जवळपास ५०० लोक तरी असणार होती, त्यामुळे २१ लोक मारणार हे सत्य असूच शकता नाही. नशिबाची गोष्ट एवढी कि bomb blast हा ७ च्या सुमारास झाला जर तो २ तास आधी झाला असता तर जवळच लहान मुलंची शाळा होती. त्याची कल्पना न केलेलीच बरी."
त्यानंतर संपूर्ण दिवस हीच चर्चा सुरु होती कि सरकार किती नाकर्ते आहे? त्यात कुठल्यश्या news channel ने माहिती पुरवली कि १३-७ हा कसाबचा जन्मदिवस आहे, आणि त्याची जन्मभेट म्हणून हे blast अतिरेकी संघटनांकडून करण्यात आले. ह्या बातमी ने तर माझा काय सगळ्यांचाच राग अनावर झाला होता. ज्या माणसाला अटक केल्या केल्या गोळ्या घालायला पाहिजे होत्या तो माणूस अजून हि सरकारी पाहुणचार घेत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा जर राज्याच्या सुरक्षेसाठी वापरली तर त्याचा कदाचित फायदा झाला असता. त्याच्यावर चालणारा खटला आणखी दिवस सरकार चालवणार आहे? मध्यंतरीच एका बातमीत असे ऐकण्यात आले कि कसाबाच्या सुरक्षेसाठी होणारा खर्च हा काही कोटीच्या घरात आहे. हा सगळा पैसा येतो कुठून आपल्या सारख्या लोकांच्या खिशातून.... (कर किवा Income Tax हा जो काही हफ्ता आपण सरकार नामक गुंडांना देत असतो त्यातूनच हा खर्च वसूल होतो). आता हे पहा ना ज्यावेळी कसाबला अटक झाली त्यावेळी अल्पवयीन होता. त्याला अटक होऊन आता ३ वर्षे होत आली तरी सुद्धा त्याला शिक्षा होत नाही म्हणजे हि सरकारी न्याय संस्थेसाठी शरमेची बाब आहे आणि हेच तर अतिरेक्यांनी हेरले आहे. भारताच्या संसद भवनात हल्ला झाला तो कधी २००१ साली, अजून सुद्धा त्याचा आरोपी अफजल गुरु याला फाशीची शिक्षा सुनावून ५ वर्षे झालीत तरी सुद्धा अजून त्याला फाशी झाली नाही. कारण भारतामध्ये प्रत्येक कायद्याला पळवाट आहे आणि त्याचाच उपयोग हे आरोपी पद्धतशीरपणे करतात.
त्यानंतर संपूर्ण दिवस हीच चर्चा सुरु होती कि सरकार किती नाकर्ते आहे? त्यात कुठल्यश्या news channel ने माहिती पुरवली कि १३-७ हा कसाबचा जन्मदिवस आहे, आणि त्याची जन्मभेट म्हणून हे blast अतिरेकी संघटनांकडून करण्यात आले. ह्या बातमी ने तर माझा काय सगळ्यांचाच राग अनावर झाला होता. ज्या माणसाला अटक केल्या केल्या गोळ्या घालायला पाहिजे होत्या तो माणूस अजून हि सरकारी पाहुणचार घेत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा जर राज्याच्या सुरक्षेसाठी वापरली तर त्याचा कदाचित फायदा झाला असता. त्याच्यावर चालणारा खटला आणखी दिवस सरकार चालवणार आहे? मध्यंतरीच एका बातमीत असे ऐकण्यात आले कि कसाबाच्या सुरक्षेसाठी होणारा खर्च हा काही कोटीच्या घरात आहे. हा सगळा पैसा येतो कुठून आपल्या सारख्या लोकांच्या खिशातून.... (कर किवा Income Tax हा जो काही हफ्ता आपण सरकार नामक गुंडांना देत असतो त्यातूनच हा खर्च वसूल होतो). आता हे पहा ना ज्यावेळी कसाबला अटक झाली त्यावेळी अल्पवयीन होता. त्याला अटक होऊन आता ३ वर्षे होत आली तरी सुद्धा त्याला शिक्षा होत नाही म्हणजे हि सरकारी न्याय संस्थेसाठी शरमेची बाब आहे आणि हेच तर अतिरेक्यांनी हेरले आहे. भारताच्या संसद भवनात हल्ला झाला तो कधी २००१ साली, अजून सुद्धा त्याचा आरोपी अफजल गुरु याला फाशीची शिक्षा सुनावून ५ वर्षे झालीत तरी सुद्धा अजून त्याला फाशी झाली नाही. कारण भारतामध्ये प्रत्येक कायद्याला पळवाट आहे आणि त्याचाच उपयोग हे आरोपी पद्धतशीरपणे करतात.
इतिहासात लक्ष घातल्यास मुंबईलाच का सारखे टार्गेट केले जाते? ती देशाची आर्थिक राजधानी आहे म्हणून कि महाराष्ट्र सरकार अतिरेक्यांविरुद्ध कार्यवाई करण्या इतके सक्षम नाही म्हणून कि मुंबई गर्दी खूप आहे, अन इथे हल्ला केल्यास संपूर्ण देशाचे लक्ष वेधले जाते म्हणून. पुढील फोटोत जर तुम्ही पाहाल तर सर्वात जास्त bomb blast हे मुंबईतच झाले आहेत.
जनतेच्या bomb blast वरच्या काही प्रतिक्रिया या वाचण्यासारख्या आहेत. त्यात त्यांचा राग, चीड आणि उद्वेग दिसून येतो.
वरील संपूर्ण व्यक्तींच्या वागण्यावरून किवा त्यांच्या सोबतच्या त्या प्रसंगामधून मला एक गोष्ट लक्षात आली कि आपल्या संवेदना बोथट नाही झाल्यात पण आपण काळा सोबत चालायला शिकलो आहे. जुन्या गोष्टींचे दुख करत बसण्यात वेळ वायाच जाणार आहे. त्यापेक्षा त्यावर उपाय शोधणे जास्त महत्वाचे. आजची पिढी संवेदनशील नाही त्यांना emotions / भावना कळत नाही अशी मोठ्यांची नेहमीची तक्रार... त्यांना मला सांगावेसे वाटते, कि या पिढीला सुद्धा भावना आहेत. आणि याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील प्रसंग आहेत. पहिल्या प्रसंगातील व्यक्तीबद्दल बोलायचे तर मी सांगू शकतो कि त्यांना संवेदना आहेत. जे झाले त्याबद्दल त्यांना वाईट होते आणि हे मी सांगू शकतो कारण त्या संध्यकाळी त्या मुलांनी सर्व बातम्या पहिल्यात त्यांच्या डोळ्यात त्या लोकांबद्दल कीव तसेच ज्यांनी हे दृष्टकृत्य केले त्यांच्या साठी राग होता. ते तिघे एक समाजाचा वेगळा पैलू दाखवतात असे वाटते.
मुंबईच्या लोकांनी खूप fighting spirit दाखवले असे म्हणणे आता कितपत योग्य आहे. याला fighting spirit म्हणावे कि हतबलता? कदाचित पु. ल. म्हणतात ते ठीकच आहे. "मुंबईकराचे घड्याळ हे त्यांचा हाताला बांधलेले नसून नशिबाला बांधलेले आहे. " वर म्हणाल्याप्रमाणे जी लोक तेव्हा रस्त्याने जात होती त्यांच्या बद्दल जरा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा. त्या लोकांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत , किवा त्यांना आता सवय झाली आहे किवा ते स्वार्थी आहेत हा विचार करण्याऐवजी त्या गर्दीत लगबगीने घरी जाणारा एखादा बाप असेल ज्याला आपल्या कुटुंबाची चिंता सतावत असेल किवा एखादी आई असेल जिला आपल्या मुलांना कधी एकदा पाहते असे झाले असेल. त्यावेळी त्यांनी दाखवलेल्या वृत्तीला स्वार्थीपणा म्हणणे कितपत योग्य ठरेल?
पण काहीही म्हणा मुंबईकरांच्या fighting स्पिरीटला खरेच salute करावासा वाटतो. ज्या दिवशी bomb blast झाला, त्याच्या दुस-या दिवशी घटना स्थळाच्या जवळच एका माणसाने नेहमीप्रमाणे सकाळी आपले छोटेसे दुकान उघडले. त्याला जेव्हा विचारण्यात आले कि तुला भीती नाही वाटत त्यावेळी त्याने दिलेले उत्तर हे मुंबईकरांचे खरे स्पिरीट दाखवते.
"दुकान बंद करके क्या करेगा साहब..... blast तो हो गया.. अभी रात को अगर खाना खाना होगा तो दिन मे काम तो करना पडेगा... तब जा के रात को निवाला मिलेगा... "
खरेच मुंबईत असे अनेकशे लोक आहेत ज्यांचे रात्रीचे जेवण हे ते दिवसभर काम करून किती पैसे मिळतात यावर अवलंबून असते. अश्या लोकांनी घाबरून घरात बसून राहणे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा.
Blast च्या दुस-या दिवशी पेपरात मृतांची नावे आलीत, ती पुढील प्रमाणे आहेत:
मृतांची नावे
( मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील माहितीनुसार )
लालचंद अहुजा हिम्मतभाई गुडिया
मोहन नाईक सुनीलकुमार जैन
संदीप शहा तुषार शहा
संजय मेहता महम्मद दरोडिया
( मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील माहितीनुसार )
लालचंद अहुजा हिम्मतभाई गुडिया
मोहन नाईक सुनीलकुमार जैन
संदीप शहा तुषार शहा
संजय मेहता महम्मद दरोडिया
(हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार )
अली असगर बटाटावाला भुपेन नबाडिया
राजेश खरे पंकज सोनी
पे्रमचंद सोनी रवी बोरा
राजीव यादव शिवाजी पाटील
सुनील राऊत
....
चार जणांची ओळख पटू शकली नाही .
शेवटची ओळ वाचून मनाला अतीव दु:ख झाले. त्यांच्या घरी कोणाची तरी आई, वडील, बायको चिंतेत असतील त्यांना जेव्हा या सत्याची जाणीव होणार तेव्हा त्यांना होणारे दु:ख याची आपण कल्पनापण करु शकत नाही. शिल्पाने म्हटल्याप्रमाणे खरेच आहे, मरणा-या मध्ये एक जरी आपले असेल तेव्हा आपल्यला समजेल कि जवळच्या माणूस गेल्याने काय त्रास होतो ते. तसे पहिले तर आपण काय करू शकतो का? अतिरेकी येतात, त्यांना आनंद मिळतो म्हणून ते Bomb हल्ले करतात, त्यात सामान्य नागरिकाचा जीव जातो आणि अनेकशे लोक जखमी होतात. भ्रष्टाचारी सरकार हे नुसते बसून, या गोष्टीवर इतर पक्षांना दोष देत राजकारण करतात (किवा खेळतात हा योग्य शब्द आहे). सरकारच्या उदासीनतेकडे आणि षंढपणाकडे आपण मूकबधीरांसारखे पाहत राहायचे आणि फक्त चर्चा करायच्या. आपण खरेच काही करू शकत नाही का?
तरी सुद्धा आपण एक काम तर करू शकतो. या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना आपण श्रद्धांजली तर वाहू शकतो. त्यांच्या आत्म्यास शांती मिलो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....
-----------------------------------------------------------------------------------------------.
** याच bomb हल्याच्या निषेधार्थ आणि मुंबईकरांच्या स्पिरीट वर भाष्य करणारा लेख माझा मित्र सारंग याने लिहिला आहे. फारच सुंदर लेख आहे. तुम्ही जरूर वाचा...
त्या article ची link :
त्या article ची link :
Amruta said.....
ReplyDeleteहि मुंबईकरांची अथवा कोणाही इंडिअन ची fighting spirit नाही. हि आपली हतबलता आहे. त्या दुकानदाराने जे उत्तर दिलं तेच उत्तर प्रत्येकच आहे. आपली मन खरंच खूप बोथट झालीयेत. आपलं govt आपणच निवडून दिलेलं आहे. मग बोल त्यांना तरी कसे लावणार? शेवटी ती राजकारण्यांची जात. अरे खर सांगायचं तर एखादी मुंगी सुध्धा तिच्या जीवावर बेतत तेव्हा कडकडून चावा घेते. आपल्यात तेव्ह्डीही ताकत नाहीये. स्वा. सावरकर, आझाद हि लोक जर वाट पाहत बसली असती तर अजूनही आपण इंग्रजांचे गुलाम राहिलो असतो. आपण माती केली रे त्यांच्या बलिदानाची.
जोपर्यंत प्रत्येक माणूस पेटून उठत नाही आणि जोपर्यंत कुणाच्या तरी फायद्यासाठी गुन्ह्यांकडे डोळेझाक होत राहील तोपर्यंत आपान असेच मारणार. कोणी सांगाव पुढचा number आपला असेल!!
मला कायम स्वा. सावरकर आठवतात. आणि स्वतःची शरम वाटते. ज्या माणसाने स्वतःच आयुष्य, संसार, मुलं आणि कितीतरी या देशासाठी त्याग केल त्याचे विचार चुकीचे ठरवून त्याला दहशत वादी म्हणल जावं या सारखं दुसर दुःख नाही. ज्यादिवशी आपल्या नोटेवरून गांधी जाऊन सावरकर/बोस येतील तेव्हाच या देशाचा विचार बदलला, मन जागृत झाली अस म्हणता येईल. आपल्यापेक्षा लाखोपट लहान असलेल्या इस्रायेल देशाकडून आपल्याला शिकणे जास्त गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी शांती ने गोष्टी नीट होत नाहीत. Eye for eye and hand for hand हेच तत्व वापरलं तर आपला देश वाचू शकतो नाहीतर थोडे वर्षांनी अर्धा भारत पाकिस्तान/ अरब countries च्या सत्ताखाली असेल आणि अर्धा बारात चीन च्या सत्तेखाली असेल.
आणि हे असाच चालू राहील तर वरच वाक्य खर व्हायला फार वर्ष लागणार नाहीत.
--अमृता