"जाने से पहले... एक आखरी बार मिलना क्यों ज़रूरी होता है..!!!! "
- Love Aaj Kal
हा dialog Love Aaj Kal मधला आहे. असे का होते कि आपण खूप वेळा 'Good Bye' म्हणालो तरी का त्या शेवटच्या वेळी त्याला/तिला भेटावेसे वाटते.... हा प्रश्न माझ्यासाठी बरेच दिवस अनुतर्रीत होता. पण कदचित मला आता त्याचे उत्तर मिळाले आहे. कदाचित यातील शब्दांचा अर्थ (त्यात दडलेले दुख) हे फक्त त्यालाच समजू शकते ज्याने आपल्या एखाद्या प्रियजनाला निरोप दिला असेल.
निरोप : साधासा शब्द... त्यामागे किती मोठे दुख लपले आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकत नाही. या निरोपाचे अनेक प्रकार असू शकतात.
- Short Term Nirop: या निरोपामध्ये ज्याला निरोप देतो तो माणूस परत येणार असतो याची Guarantee असते.
- Long Term Nirop: या निरोपामध्ये ज्याला निरोप देतो तो माणूस परत येणारच याची Guarantee नसते.
खूपशे निरोप हे कष्टदायक असतात. तुम्ही आई वडिलांना सोडून दुसर्या गावी किवा परदेशी जात असाल किवा एखादी प्रेयसी प्रियकराला सोडून जाताना किवा कुणी आपल्या खूप जवळची व्यक्ती मृत झाली किवा कायमची सोडून गेली अश्या प्रकारचे जे काही निरोप असतात ते फार कष्टदायक असतात. आतून फार दुख होते.आजच्या धकाधकी च्या जीवनात मनुष्याला भाव भावना उरल्या नाहीत, तो खूप जास्त Practical झाला आहे अशी तक्रार मोठ्या लोकांची असते.
मला पण कधी कधी ते पटायचे.पण काल माझ्या सोबत झालेल्या प्रसंगानंतर माझी विचार करण्याची दिशा बदलली.
Flashback.....
काल मी माझ्या एक मित्राला पुणे रेल्वे स्टेशन वर सोडायला गेलो होतो. त्याच्या गाडीला वेळ होतो म्हणून आम्ही स्टेशन वर गप्पा मारत बसलो. त्यावेळी आम्हाला एक जोडपे आमच्या शेजारच्या बाकड्यावर दिसले. जोडपे कसले प्रेमी युगल म्हणता येईल त्यांना..... त्यांच्या वागण्या वरून ते नवरा बायको वाटत नव्हते. कारण मुलगी थोडशी लाजत (???) होती. त्यांचे ते गुलूगुलू बोलणे चालू होते. मी आणि माझ्या मित्राने एक दोन वेळा त्यांच्यावर नजर टाकली. ते आनंदी जोडीचे आमच्या कडे लक्ष पण नव्हते. ते त्यांच्या गप्पा मध्ये रंगले होते. हळूच त्या मुलीने त्याला मारणे, रुसून बसणे, मध्येच जोरात हसणे असे प्रकार चालू होते. त्यांच्या समोरून येणारे जाणारे लोक त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने पाहत होते प्रत्येकाच्या नजरेतून मला एकच गोष्ट कळत होती. "आज कालच्या मुलांना काही म्हणजे काही लाज नाही राहिली." ते पाहून आम्हाला पण थोडेसे वाईट वाटले. पण नंतर आम्ही त्या गोष्टी कडे दुर्लक्ष केले. हि म्हणजे typical मध्यमवर्गीय लोकांची सवय (Middle Class) लोकांची सवय, ज्या गोष्टी बद्दल आपण काही करू शकत नाही तिच्या कडे दुर्लक्ष करायचे. देशात भ्रष्टाचार वाढला, घोटाळे झाले, मी काय करू शकतो म्हणून लक्ष देणेच बंद करायचे. असो (ती एक कधी न संपणारी चर्चा आहे).
थोडया वेळानंतर गाडीच्या आगमनाची घोषणा झाली कि गाडी इतक्या वाजता येईल. त्याच्या थोड्यावेळानंतर माझे त्या शेजारच्या जोडीकडे लक्ष गेले. इतक्या वेळचे चीमाण्यासारखे चिवचिवाट करणारे ते जोडपे अचानक शांत झाले होते. त्यांच्या बोलण्यालमध्ये अचानकपणे एक प्रकारचे दुख: जाणवू लागले. मला सुरवातीला कळेच ना कि अचानक काय झाले. ती मुलगी हलक्या आवाजात रडत होती. तू मुलगा तिला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच वेळी त्याच्या पण डोळे ओलावलेले होते.आम्ही जास्तच confuse झालो. कुतूहल हे माणसाला कधीही स्थिर राहू देत नाही. थोड्या वेळानंतर परीस्तीती अजून बिकट होत असलेली पाहून शेवटी आम्ही त्यांना विचारले काय झाले. सुरवतीला त्यांनी नकार दिला पण नंतर ते सांगू लागले. त्या मुलाच्या बोलण्याचा हा सारांश......
"आम्ही दोघे एकेमेचांचे खूप चांगले मित्र होतो, या मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. आमच्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, आम्ही दोघे एकमेकांशी लग्न करायला पण तयार आहोत पण या आमच्या दोघांची जात वेगळी आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या घरून लग्नाला विरोध होणार हे विधिलिखित होते. तरीही आम्ही हिम्मत करून घरी विचारले आणि उत्तर जे आम्हाला अपेक्षित होते तेच मिळाले. आणि हिचे आई वडील हिच्या लग्नाची घाई करत होते. हिचे लग्न आता ठरले आहे. आणि ती आज तिच्या लग्नासाठीच चालली आहे. या येणाऱ्या गाडीने तिचे आई वडील येत आहेत आणि तिला लग्नासाठी घेऊन जात आहेत. ती may be मला परत कधीही भेटणार नाही आणि ह्याची तिला पण जाणीव आहे. त्यामुळे आम्हाला रडू येत आहे."
हि गोष्ट त्या मुलाने आम्हाला सांगितली, का हे मला पण समजले नसले may be त्यावेळी त्याला झालेले अतीव दुख ह्याला जबाबदार असेलही कदचित. पण या सर्व गोष्टीमुळे मला खूप धक्का बसला. खरेच आपला समाज अजून हि इतका मागासलेला आहे का? (याला मागासलेपण म्हणावे कि संस्कृतीरक्षण कि हट्टीपणा?). अजून हि समाजामध्ये प्रेमविवाहाला स्थान का मिळत नाही. त्या लोकांकडे अजून हि धिक्कारतेच्या नजरेने का पाहतात? असे अनेक प्रश्न मनात दाटून आले. ज्या लोकांची प्रेम प्रकरणे सफल होतात ती लोक खरच सुखी आहेत का? त्या मुलाला आता काय वाटत असेल. का त्या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. यात त्यांचा काय दोष? ते लोक काय सामान्य लोकांपेक्षा [Common People /Mango People (पुन्हा Love Aaj Kal)] वेगळे असतात का? Mango people प्रेम करतात, त्याचे प्रेम सफल होते, त्यांच्यात भांडणे होते नाही, झाली तरी थोडीशी, त्यांच्यात एकमेकांवर विश्वास असतो, त्यांच्या life मध्ये कोणी तिसरा नसतो आणि कुठल्याही प्रेम प्रकरणाचा गोड शेवट म्हणजे ते लग्न करतात. थोड्यावेळाने मी त्याला म्हणालो "जाऊन दे जे झाले ते विसरून जा. तुम्ही यानंतर पण भेटू शकता चांगले मित्र म्हणून... " यावर तो फक्त हसला आणि म्हणाला "हिचे लग्न होणार आहे त्यानंतर कशी राहील आमच्यात मैत्री?" त्यावर माझ्या मित्राचे मत "खरच आहे, अश्या relationship नंतर तुला काय वाटते ते परत मित्र म्हणून राहू शकतात का?" मी त्यावेळी शांत बसलो आणि पण मनात प्रश्नांचे काहूर माजले होते.
खरेच समाजासाठी दोन लोकांनी लग्न करणे यातच त्यांच्या प्रेमाचे सार्थक होते का? लग्न केल्यानंतरच त्यांचे प्रेम सफल होते का? त्यांच्यातील प्रेम हे निरंतर आणि चिरतरुण का राहू शकत नाही? आणि समजा काही कारणास्तव त्यांचे लग्न नाही झाले तर ते मैत्री चे नाते का नाही पुढे continue करू शकत. ज्या मैत्रीच्य नात्यातून ते प्रेमाच्या नात्यात पडले तेच मैत्री चे नाते का जन्म भर पुढे continue नाही करू शकत. का लग्न झाल्यानंतर मुली इतक्या बदलतात कि ज्या मित्रासोबत त्यांनी इतके चांगले आयुष्यातील क्षण घालवले त्या नात्याचा त्यांना लग्न झाल्या बरोबर विसर पडतो. या वर बर्याचश्या मुलींचे उत्तर “आमच्या नवर्याला किवा सासरच्या लोकांची मर्यादा” असे असेल. पण हा त्याहून जास्त चिंतेचा विषय आहे. आपण शास्त्रीयदृष्ट्या प्रगत झालो असे म्हणणारे आपण बौद्धिक आणि वैचारिक गोष्टींमध्ये अजून हि ७०च्या दशकात वावरत आहोत. नवर्यानं ‘बायकोचे मित्र’ चालत नाही आणि बायका पण ‘नवर्याची मैत्रीण’ हि संकल्पना अजून मान्य करू शकल्या नाहीत. आपल्या प्रिय मित्र किवा मैत्रिणीशी आपल्याला बोलता न येणे हे सुद्धा एक प्रकारचे बंधनच आहे.
हि विचारची चलबिचल सुरु असतानाच गाडी आली. रविवार असल्यामुळे गाडीला बरीच गर्दी होती, त्यामुळे मित्राला कशीबशी गाडीत जागा मिळाली आणि तो गाडीत आणि मी platform वर अश्या आमच्या गप्पा सुरु झाल्यात. Track वर काहीतरी प्रोब्लेम झाला होता कि सिग्नल नव्हता या पैकी कुठल्यातरी एक कारणामुळे गाडी ला निघायला उशीर होत होता. माझ्या डोक्यात अजून हि त्या जोडीबद्दल विचार चालू होते. त्यांना शोधण्यासाठी मी platform वर नजर फिरवली. थोड्या अंतरावर मला ती फक्त ती मुलगी दिसत होती. तिच्या सोबत एक वृद्ध गृहस्थ आणि एक जवळपास त्याच वयाची स्त्री दिसत होती. ते तिचे आई वडील असावेत. ती त्यांना भेटली. त्यांच्याशी हसून बोलत होती. मला मोठे नवल वाटले. पण माझी नजर त्या मुलाला शोधात होती. तो मला platform कुठेच दिसेना. बर्याच वेळानंतर तो मला दिसला. Platform वरच्या जिन्यावर तो उभा दिसला. तो एकटक त्या मुली कडे पाहत होता. आतापर्यंत फक्त पाणावलेल्या त्याच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते. त्याच्या डोळ्यात एक अगतिकता होती. त्या मुलीला त्याला शेवटचे BYE म्हणायचे होते, पण ते शक्य नव्हते. सुरवातीला मला त्या मुलीचा राग आला, कि ज्या मुलाबरोबर ती इतका वेळ सोबत होती आणि प्रेमाचे गोडवे गात होती, त्या मुलाला तिने अश्या तर्हेने वागणूक द्यावी. त्याला साधे BYE हि म्हणू नाही दिले. It's really disgusting, आणि ती मुलगी त्याच्या कडे पाहत पण नव्हती.
पण कदाचित तिचे आई वडील असल्यामुळे ती अशी वागत असावी. एव्हाना ती मुलगी गाडीत बसली होती. गाडी सुटण्याची वेळ झाली होती. अचानक मला ती मुलगी रेल्वेच्या दाराशी दिसली. कदचित ती त्याला भेटायला जात असावी (अखेरचे). तिला येताना पाहून मुलगा सुद्धा पटापट जिना उतरायला लागला. पण तेवढ्यात गाडी सुटली. ती मुलगी platform वर उतरू शकली नाही. तो मुलगा पळत येत होता. (मला वाटले आता हिंदी picture मधला scene होणार, ती उडी टाकणार किवा हा गाडीत चढेल. DDLJ style. पण तसे काही झाले नाही. This is REAL life not REEL life.) ती त्याला हाताने गाडी पासून दूर जाण्याचा इशारा करत होती. गाडी वेग धरला. तो एकाच जागी थबकला. नकळत त्याचा हात उचलला गेला आणि तो bye करण्यासाठी हलला. कदाचित त्याला हाथ हलल्याची त्याला सुद्धा जाणीव होत नसावी.
त्या मुलाकडे पाहिल्यावर मला प्रथमच खर्या प्रेमाची जाणीव झाली. आजकाल आपण पाहतो कि मुल-मुलीसाठी relationship म्हणजे एक खेळ झाला आहे. भारतात राहूनही आपले relations हे परदेशातल्या लोकांसारखे असतात. पण आज या मुलाकडे पाहून मला वाटले कि खरेच प्रेम हि एक असमान्य गोष्ट आहे. जर बुजुर्ग मंडळीनी त्या मुलाला पहिले असते तर त्यांचे आताच्या पिढीबदलचे मत निश्तितच बदलले असते. आताची पिढी हि फक्त व्यवहारिक नसून तितकीच भावनिक पण आहे. बराच वेळ तो स्तब्ध होता. त्या गाडीकडे निर्विकार चेहऱ्याने पाहत होता. आपल्या प्रेयसीला शेवटच्या वेळी निरोप देणे हे कदचित त्याच्या नशिबात नव्हते. मी त्याच्या कडे पाहत होतो. त्याने डोळे पुसले. तो मागे फिरला आणि चालयला लागला. त्याच्या चालण्यात एक प्रकारचे नैराश्य होते. तो तसा चालत होता आणि निघून गेला. त्यावेळी मला राहून राहून संदीप खरे यांच्या काही ओळी आठवल्या:
गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला
Nice article.
ReplyDeleteI think most of the mango peoples have same experience.
मित्र खुप छान लिहिल आहेस अणि शेवटच्या परिच्छेदात तर भावनांचा
ReplyDeleteकल्लोळ आहे. मी काय लिहू अरे या विषयावर ? हे प्रत्येकाच्या बाबतीत
घडतच असत..... फ़क्त २ गोष्ट किंवा ओली आठवतात...
१) अपेक्षाभंगाच दुःख फार मोठ असत
२) जिंदगी के सफर में गुजर जाते हे जो मक़ाम, वो फिर नही आते.
Thank You Prashant......
ReplyDeleteI like that you have also used the word "Mango people"
धन्यवाद सारंग.....
ReplyDeleteफारच कमी शब्दात तू आपले म्हणणे प्रभावीरीत्या मांडले आहेस.
माणूस अपेक्षा अश्याच लोकांकडून ठेवतो ज्यांच्या कडून ती पूर्ण होण्याची अपेक्षा त्याला असते, आणि त्याचं लोकांनी दगा दिल्यास किवा नकार दिल्यास त्यासारखे दुख नसते.
जिंदगी के सफ़र में कुछ मक़ाम असे होते हैं जिन पर जाकर जिंदगी की गाड़ी थमसी जाती हैं......
I think its the best article of yours till date. I liked the fact that you understood the true feeling of the boy on the station. I hope you could understand girls' too. But its difficult for every man to understand woman. anyways its very nice feeling put together for the 'Nirop'. All the best.
ReplyDeleteReally nice any heart touching article.
ReplyDelete