धर्म
आपण बर्याच वेळा म्हणतो कि हा माझा धर्म आहे किवा तो त्या धर्माचा आहे हि गोष्ट आपल्या समाजामध्ये फरक आणि तेढ निर्माण करणारी आहे. बरेचसे राजकीय वाद या धर्म आणि जाती या विषयावरूनच होतात. आशुतोष गोवारीकर यांचा स्वदेस ह्या चित्रपटात एक सवांद आहे "जो कभी नाही जाती वोह 'जाती' हे ". एक ओळीचा सवांद पण त्या मागे किती मोठा विचार आहे. आपला धर्म काय हे आपल्याला खरेच कळेल आहे का? पण जेव्हा देवा ने धर्म, जाती निर्माण केल्या तेव्हा त्याला खरच हे अभिप्रेत होतो का. जर आपण देवाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर त्याचे काय मत असू शकेल. त्याचा दृष्टीने केलेला हा एक विचार..........
देवाच्या मते धर्म खरे तर खूप साधा आणि सरळ आहे. त्याची तत्त्वेही तेवढीच साधी आणि सोपी आहेत. सत्याने वागा असे देवाने सांगितले, पण मानवी सत्य हे मानवी विकारांनी व्यापलेले सत्य असते. त्यामुळे साधे-सरळ सत्य दूर राहते. आणि मानवी सत्य हे केवढे विरोधाभासाने भरलेले आहे.
देवाला अभिप्रेत असलेला धर्म आणि मनुष्याच्या आचरणात असलेला धर्म यात जर खूप अंतर असेल तर ज्या सृष्टीसाठी देवाने धर्म निर्माण केला त्या धर्मात काहीच तर नाही ना असे कोणासही वाटणे स्वाभाविक आहे.
देवाला अभिप्रेत असलेला धर्म आणि मनुष्याच्या आचरणात असलेला धर्म यात जर खूप अंतर असेल तर ज्या सृष्टीसाठी देवाने धर्म निर्माण केला त्या धर्मात काहीच तर नाही ना असे कोणासही वाटणे स्वाभाविक आहे.
हे विश्व देवाने निर्माण केलेल्या धर्माने चालते, दृश्य आणि अदृश्य अशी सृष्टीही माझ्या तत्त्वांनी चालते. प्रकाश आणि अंधार हे स्पष्ट वास्तव सारीच सृष्टी रोजच अनुभवते. कारण ते सत्य आहे. जन्म आणि मृत्यू हे वास्तव हि सृष्टी रोजच अनुभवते. कारण दोन्हीही सत्य आहेत. ज्याप्रमाणे जन्म हे सत्य आहे मृत्यू हे अटळ सत्य आहे. 'आहे आणि नाही' यातील फरकही सारीच सृष्टी नित्य अनुभव करते, कारण तेही शाश्वत सत्य आहे, आणि जे 'आहे' ते 'आहे' असे मानून चालणारी सृष्टी जे 'नाही' ते 'नाही' हेही गृहीत धरते.
पण मनुष्याची गोष्टच वेगळी. तो जे 'आहे' ते 'आहे' हे मान्य करूनही जे 'नाही' ते 'आहे' कसे बनवायचे यासाठी जीवापाड कार्य करीत असतो आणि नाही ते 'आहे' बनवण्यासाठी अनंत यातना सहन करीत असतो. त्यासाठी शत्रू बनवीत असतो आणि त्यासाठीच मित्र बनवीत असतो.

कारण धर्म म्हणजे नेमके काय हा प्रश्न मनुष्यास केव्हा ना केव्हा अवश्य पडत असतो. धर्म ही मूलत: मानवनिर्मित गोष्ट नाही. मनुष्य ज्या धर्मास निर्माण करतो आणि त्या स्वनिर्मित धर्मामुळे आपले आणि इतरांचे कल्याण होईल असे समजतो, तो मुळात मानवी धर्म असल्याने आणि या धर्माचा निर्माता मानवच असल्याने मानवी विकारांचा किवा भावनाचा स्पर्श मानवी धर्मास होणे साहजिक आहे.
पण मनुष्य हाही या सृष्टीचे अपत्य असल्याने सृष्टीधर्म किवा देवाने तयार केलेला धर्म त्यालाही लागू पडत असतो. परंतु मायेमुळे मनुष्य सृष्टीचा धर्म समजावून घेण्यात अपयशी ठरतो. मानवी विकारांचे कारण त्याचे मन होय आणि या मनामुळे मनुष्य राग, लोभ, दया, हिंसा, स्वार्थ, परमार्थ या विकारांनी ग्रस्त होत असतो. या विकारांमुळेच मनुष्य ब्राह्मण धर्म, क्षात्र धर्म, वैश्य धर्म आणि शूद्र धर्म हा वेगवेगळा आहे असे समजून मानवी धर्माचे विभाजन केले.

शिवाय या मानवी धर्माचे नियंत्रण स्वत: मनुष्यच करीत असल्याने परिस्थितीनुरूप धर्माचे परिवर्तन करण्यात येत असते. शिवाय धर्माचे नियंत्रण नेमके कोणत्या मानवी गटाच्या हातात आहे त्यावरही धर्माचे स्वरूप बदलू शकते. जर ते बलहीन आहेत तर त्यांच्यावर धर्म लादला जातो, आणि जर जे शक्तिशाली आहेत तर तेच आपल्या मताप्रमाणे धर्म घडवतात. हा इतिहास आहे. बरेचसे मोठे युद्ध या गोष्टीमुळेच घडतात.
याचाच अर्थ असा की, मानवी धर्म अनिश्चित असून तो अशक्य नाही. धर्म ही मनुष्याची विशिष्ट परिस्थितीतील सोय होय आणि जो धर्म मनुष्य आपली सोय म्हणून वापरू शकतो तो धर्म शाश्वत आणि चिरंतन आहे असे कसे म्हणता येईल?याचाच अर्थ मानवी धर्म शाश्वत नाही आणि जे शाश्वत नाही त्याचे आचरण करण्याचा आग्रह कोणी का धरावा?

जेव्हा आकाशातील सूर्य, चंद्र पृथ्वी आपला प्रकाश देतात तेव्हा ते कोणाला सुख देतात तर कोणाला दुख देतात. ते याचा विचार नाही करत. त्यांच्यासाठी सर्व प्राणीमात्र एक सारखे असतात. मनुष्य मात्र प्रत्येक कर्म करीत असता स्वत:स सुख होते की इतरांस याचा विचार करीत असतो. ही धरतीमाता जेव्हा अन्न देते पिक पिकवते तेव्हा ते अन्य चांगले लोक खाणार आहेत की वाईट याचा विचार करीत नाही. कारण तो तिचा धर्म आहे; पण मनुष्य मात्र आपल्या कर्माचे फल कोणास मिळणार आहे, याचा विचार करत असतो आणि केवळ विचारांनीही तो सुखी किंवा दु:खी होत असतो. धर्म फार साधा आणि सरळ आहे; पण त्यासाठी तेवढेच सरळ मन हवे, आणि आता मन ही एवढी गूढ गोष्ट बनली आहे. मनुष्यास, अन्य प्राण्यांस सगळ्यांना मन आहे भावना आहेत, पण मनाने मनुष्य आकाशात भरार्या घेत असतो, दिवसरात्र स्वप्न पाहत असतो स्वप्न पाहणे चांगले पण त्या मागे लागून स्वताच्या आयुष्याची वाताहत करून घेणे हे चुकीचे. प्राप्त स्थितीत असंतुष्ट राहणे हा माणसाचा धर्म आहे आणि तोच देवाच्या मते अधर्म आहे.
मला तर असे वाटते कि देवाने निर्माण केलेला धर्म या मानवी जीवनात कसा लागू पडतो हे अनुभवण्यासाठीच देवाने महाभारताचे युद्ध रचले होते. जिथे स्वत: धर्माचे अस्तित्व असताना अधर्म घडला. स्वत: भगवंत युद्धभूमीवर असूनही अधर्म घडला.
विचित्र अश्या परीस्थित मनुष्य कसे आपल्या धर्माचे पालन करतो या गोष्टीचा शोध घेण्यासाठीच देव आपल्या आयुष्यात आपल्या समोर अनेक चांगले वाईट प्रसंग आणतो त्या प्रसंगाना तोंड देताना आपल्या मानवी धर्माचे आपण किती पालन करतो हि गोष्ट महत्वाची ठरते.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
वरील श्रीकृष्णाच्या तोंडचे गीतेंतील श्लोक (अध्याय ४, श्लोक ७ व ८) आपणांपैकी बहुतेकांना ठाऊक असतील. त्यांत जगांत अधर्माचरण (पाप?) जेव्हा वाढते तेव्हा परमेश्वर स्वत: अवतार घेऊन ते नाहीसे करतो असे सूचितकेले आहे. परमेश्वराला परत धरतीवर पापानाशासाठी अवतार घ्यावा लागेल याची प्रत्येक माणसाने काळजी घ्याला हवी. मानवाने आपल्या धर्माचे पालन योग्यपणे आणि नीतीला धरून करावे. हीच माफक अपेक्षा.